वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट व संबोधी अकादमीतर्फे भव्य आयोजन
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : दौलताबाद येथील शांतीदूत बौद्ध विहारात वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट, थायलंड आणि संबोधी अकादमी, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत भगवान बुद्ध मूर्ती (बुद्धरुप) स्थापना समारंभाचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पूज्य भदंत फ्रामहा प्रपत जिरावांगसो जिरापोंगमत्ते, (सहायक, पूज्य भंते फ्रा धम्माचायो, संस्थापक धम्मकाया फाऊंडेशन, थायलंड) यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पूज्य भदंत डॉ. पोरनचाई पावलधम्मो पिन्यापोंग, अध्यक्ष वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट, थायलंड यांनी भूषविले प्रमुख अतिथी म्हणून किडुन्या सिरिखम (समन्वयक, थायलंड-इंडिया पिलग्रीमेज टूर्स), एचएसयू त्झू-लीन (फिलानथ्रॉपीस्ट, तायवान), आणि डॉ. मिथीला चौधरी (बांग्लादेश, संयुक्त सरचिटणीस, वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट) उपस्थित होते.
या सोहळ्याचे संयोजन समाजभूषण डॉ. भीमराव हत्तीअंबीरे, संस्थापक अध्यक्ष संबोधी अकादमी, महाराष्ट्र व उपाध्यक्ष युवक विकास व सबलीकरण, वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट यांनी केले होते. डॉ. भिमराव हत्तीहबीरे यांनी गोतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारित भाष्य केले, गोतम बुद्ध यांचे विचार मानव कल्याणासाठी आहे त्याचे आचरण करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. हा समारंभ आंतरराष्ट्रीय बौद्ध ऐक्याचे प्रतीक ठरणार आहे असे डॉ मिथीला चोधरी यांनी सांगितले. पुढे बोलताना त्यांनी समाजसेवक सैय्यद लायकोद्दीन यांच्या कार्याची प्रशंसा केली. तत्पुर्वी पंचशील
व निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले त्रिसरण पंचशील पठण आणि दीपप्रज्वलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाला राजेंद्र हिवराळे, सुरेश त्रिभुवन, रवींद्र दिवेकर, राहुल साळवे, साहेबराव दिवेकर, भीमराव बोर्डे, सुभाष त्रिभुवन, विलास गायकवाड, कारभारी गायकवाड, प्रकाश रूपेकर, झुंबरलाल गायकवाड, विलास गायकवाड, प्रकाश किर्तीकर, राजु गायकवाड, गौतम पैठणे, एकनाथ गायकवाड, रवि बोडें, सिद्धार्थ त्रिभुवन, बाबासाहेब कीर्तीकर, संतोष दिवेकर, उमेश बोर्ड, प्रदिप पवार, आकाश गायकवाड, अशोक दिवेकर, गौतम गायकवाड, अश्वजीत रूपेकर, अभीजीत रुपेकर, मिलिंद बोर्डे, दिनेश बोर्ड आदिंसह भिम सैनिकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
माजी ग्रामपंचायत सदस्य सैय्यद लायकोद्दीन यांनी सुत्रसंचलन केले. यावेळी माजी आमदार संजय वाघचौरे, सरपंच शबाना शेख करीम, उपसरपंच सैय्यद मतीन, ग्रामपंचायत सदस्य सैय्यद शेरु, दिपक घुसळे, योगेश पाडाळे, महेश रोकडे, किरण साळवे, मा. सरपंच सैय्यद हारुण, दत्तोपंत सुराशे, विमलताई बनसोडे, सुरेश गायकवाड, कड्डु जाधव, रामदास इंगळे, आतिश पंडीत, नरेश बळी, कृष्णा रोकडे, शेख लाला, कल्याण कांजुणे, विनोद कांबळे, आतिश गायकवाड, सैय्यद शफीक, शेख शकील, समस्त पत्रकार बांधव, नागरिक व बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने नागरीकांची उपस्थिती होते.
















